प्रेम हे काय असत
फक्त एक दिखावा असत
दोन्ही बाजूंनी जडल
तर काही दिवस टिकत.
एकतर्फी असेल तर
गूरफडत घुसमटत रहात.
गॅस वरील कुकर सारखं
वाफ आहे तो पर्यंत
शिट्या वाजवत रहात
काहींचं प्रेम हे
दुधा सारखं असतं
प्रथम चांगलं तापत.
तापूत तापून उतू येत
शेवटी आटून आटून
करपून जात...
एकच प्रेम असं असत
सूर्या सारखं दिवसा
उन्हा सारखं कडक
अनं रात्री चंद्रा सारखं
शीतलता देत रहात
ते दिखावा ही करत नाही
कि कधी आटत ही नाही
की कधी करपत ही नाही
ते प्रेम फक्त आई बाबाचं असत.
श्री. अजयकुमार लांडगे.
Comments
Post a Comment