काय करतोस कुणासाठी....

काय करतोस कुणासाठी
कोण आहे तुझं इथ 
तो माझा मी त्याचा 
नात्यात तू गुंतोतोस 

पळ पळ पळतोस
राब राब राबतोस
काबाड कष्ट करून
घाम तुझा गाळतोस

मान नसेल तिथं तरी
मान पानासाठी झठतोस 
याच वैर त्याच वैर घेऊन 
आपल्यान साठी लढतोस 

भाड्या रुपी शरीरात
आयुष्य काढशील 
वेळ आल्यावर मग
स्वगृही जाशील...

ज्यांच्यासाठी दिवस रात्र
लढत होतास झगडत होतास 
नुसता सैरावैरा पळत होतास
ते सगळे घरी निघून जातील

तू फक्त शेवटी एकटाच
जळत राहशील....
तू फक्त शेवटी एकटाच
जळत राहशील....
         
             श्री अजयकुमार लांडगे
           मु.पो.- मांडवगण ता श्रीगोंदा
               जिल्हा- अहिल्यानगर...
            दिनांक  20/03/2024

Comments