**आज्जी**
नव्हती कोणा एकाची
साऱ्या परिवाराची तू होतीस ग ...
तळहाताच्या फोडा वाणी
जपणारी तू होतीस ग...
नजर साऱ्या परिवारावर
कासवा सारखी तुझी ग...
कासवाच्या पिल्लावाणी
लेकरे सारी तुझी ग...
नजरेत तुझ्या ही
सारीच दूध प्याली ग...
लहानाची रोपटी ही इवली
तुझ्या कुशीत मोठी झाली ग...
सुख दुःखात आज्जी सर्वांना
तुझी साथ लाभली ग...
आडी नडीला साऱ्याच्या
मदतीला धाव तुझी ग...
कधी ना केला दुजाभाव
हा माझा हा तुझा ग....
प्रेमाने तुझ्या गं आज्जी
सर्वांना लागला लळा ग...
आपल दुःख सारून बाजूस
सर्वासाठी लढलीस लढा ग...
कधी ना केला लेक-सून
जावा-जावा त दुजेपणा ग...
वहिनीआज्जी, तू अन् मामी
दुर्गेचा अवतार आम्ही पाहिला ग....
सागडे अन् आप्तेष्टांचा हा
सुंदर वटवृक्ष आम्ही अनुभवला ग...
चंदनाच्या प्रमाणे सुगंध येथे
दिवस रात्र दरवळला होता ग...
वड वठला आज्जी आता
तुमच्या सर्वांच्या जाण्याने ग...
भिंत खचली, खांडे तुटली
वाडा हा ढासळला ग...
संस्काराच्या शिदोरीवर तुमच्या
पारंब्या आज बहरत आहेत...
कास धरून घट्ट संस्काराची
जोमाने त्या उभ्या आहेत...
जोमाने त्या उभ्या आहेत...
(तुझा.... अजय)
Comments
Post a Comment