कर्म आणि जीवन

जीवन हे स्वप्न आहे
कधी येथे कधी दूर आहे
चढ उतार तुझी रे 
तुझे तुलाच झेलायचे आहे
कोणी नाही मदतीला 
तुझे तुला सांभाळायचे आहे 
तुझ्या जीवनात तू 
तूच एकमेव येथे 
बाकी सर्व काही 
स्वप्न रूपी जमा आहे
जीवनी नाही तुझे काही 
करणारे कर्म फक्त तुझे
शरीर पण जाशील सोडुनी 
कर्म बरोबर नेणार आहे
भेटतील वाट सुरू तुला 
जीवनाच्या या वाटेवर 
मैल दो मैल साथ देतील 
कायमची साथ तुला 
तुझे कर्म तुला देतील 
सुंदर कर्माने तुझ्या रे
चारित्र्याचा विकास होईल 
कर्म तुझे अत्तरासारखे 
सुगंधासारखे दरवळतील
सुगंधासारखे दरवळतील...

श्री अजयकुमार लांडगे
7/12/2024
स्थळ- अहिल्यानगर










Comments