श्री विष्णु-नरसिंह स्तोत्र
जय जय जगदीशा, त्रिभुवन पाळका,
कमलनायना, विष्णू, तूच तारका.
ब्रह्मांड नायक, अनंत रूप तूझे,
तेजाने झळके, विश्व तूझे हे साजे.
प्रलयकाळातही, तूच आधार,
धर्म रक्षणासी, घेसी अवतार.
हिरण्यकश्यपूच्या गर्वाला भीडण्या,
नरसिंह रूप तू धरिले, भक्ता उद्धरण्या.
अर्धे नर, अर्धे सिंह, अद्भुत रूप तुझे,
नखांनी विदारिले, दुष्टांचे ते ओझे.
स्तंभातून प्रकटलासी, उग्र रूप धरुनी,
भक्त प्रल्हादासी, रक्षिले तू करुणी.
शांत स्वरूप तूझे, विश्व शांती देई,
उग्र रूप तूझे, दुष्टां भय दावी.
तुझ्या चरणी अजय नमन, वारंवार करीतो,
कृपा दृष्टी असावी, हीच प्रार्थना मागतो.
ॐ नमो भगवते वासुदेवाय,
नरसिंह देवाय, विष्णवे नमः।
Comments
Post a Comment