मान्सूनपूर्व पाऊस
उष्णतेने तापलेली, ही धरा व्याकुळ झाली,
पाण्यासाठी चातकासम, तिला आस लागली.
आकाशात जमती, काळे कुट्ट ढग हळूच,
गार वाऱ्याची झुळूक, स्पर्श करते नाजूक.
मातीचा तो गंध, किती ओळखीचा सुगंध,
पहिल्या पावसाची ती, ओढ मनाची.
टप टप थेंब पडती, पानांवर, गवतावर,
शेतकरी राजा निघे, आपल्या शेतावर.
बी पेरणीची तयारी, आता सुरू होईल,
निसर्गाच्या कृपेने, पीक जोमाने येईल.
विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट,
पावसाच्या आगमनाचा, हा मोठा थाट.
धरतीचे भाग्य उजळे, चिंब चिंब होई,
मान्सूनपूर्व पाऊस, नवी उमेद देई.
मान्सूनपूर्व पाऊस, नवी उमेद देई.
श्री अजयकुमार लांडगे (अहिल्यानगर)
ajaykumarlandge@gmail.com
Comments
Post a Comment