रंग मोहर...

वैशाखाच्या उन्हाच्या झळांनी, धरणी तापते जेव्हा, 
घामाघूम जीव होतो, अंग भाजते तेव्हा.
त्याच वेळी येतो तो, गुलमोहर डौलाने,

भगव्याची उधळण, करतो मोठ्या ऐटीने.
उन्हाळ्यातला लाल साज लालेलाल तो बहरतो, 
जणू अग्नीचा गोळा, प्रत्येक कळीतून फुलतो, 
एक नवा रंग सोहळा. धरती वरती खुलतो.

रस्त्याकाठी, घराभोवती, माळावरती दूर,
लाल फुलांचा सडा पडतो, मन मोहून टाकतो पूर 
भर दुपारी तापलेल्या, मातीच्या अंगणात,
शांतपणे निजतो तो, रंगांच्या या पांघरणात.

पाहता त्याला डोळे मिटती, मनाला शांतता मिळे,
कष्टाळू उन्हाळ्याचे, सारे कष्ट विसरून जाई.
जणू काही तो अग्निकुंड, धरतीवर पेटलेला,
पण दाह नाही त्याचा, फक्त शीतल रंगाने भरलेला.

ऋतू बदले कुस हळुवार दबक्या पावलाने
वर्षा तला हिरवा रंग पावसाळ्याची चाहूल लागे,
येईल भरून आभाळ, सर सर पाऊस पडे, 
सुगंध येई मातीचा दूर वर आनंद भरे

तीच वेळ असते त्याची, नवा वेष घेण्याची,
लाल रंग झाडून सारे, हिरवागार होण्याची.
शांतपणे तो उभा राही, पानांचा हिरवा साज,
जणू धरतीने ल्यालाय, एक नवा सुंदर ताज.

थेंब थेंब झेलत असतो, पानांवर डोलत असतो,
शांत आणि स्थिरपणे, निसर्गाशी बोलत असतो.
बहरण्याचे चक्र तोच गुलमोहर असतो, 
तोच वृक्ष महान, आनंदाने डोलत असतो.

कधी लाल उन्हाळ्यात, कधी हिरवा शांत.
कधी देतो तो फुले, कधी फक्त पाने,
प्रत्येक रुपात त्याचा, सौंदर्य वेगळेच भाने.
ऋतू बदलले तरी, कार्य त्याचे चालू राहते.

वर्षानुवर्षे आपली, शोभा दाखवत तो.
कधी लाल रंगाने, मनाला वेड लावतो,
कधी हिरव्या रंगाने, डोळ्यांना थंडावा देतो.
असा हा रंग मोहर, मनाचा शांत सोबती,

उन्हाळ्याची उष्णता, पावसाळ्याची शांती.
सदा बहरलेला, सदा प्रेरणा देतो,
निसर्गाच्या किमयेचा, तो उत्तम नमुना असतो
निसर्गाच्या किमयेचा, तो उत्तम नमुना असतो.

Comments