श्रीमंती नको, माणुसकी हवी
देवा, नको मज ती श्रीमंती,
जिथे फक्त पैशांचा माज.
नाव नाही आलं तरी चालेल,
त्या जगाच्या यादीत आज.
असेल जरी मी सामान्य माणूस,
तरी चालेल साधी राहणी.
पण एकच इच्छा मनी, देवा,
श्रीमंत असो माझी वाणी.
माणुसकीच्या यादीत मात्र,
माझे नाव प्रथम येऊ दे.
गरजूंना मदतीचा हात,
देता यावा, हीच आस मनी आहे.
नकोत मला ती उंची पदे,
नकोत ती मोठी नावे.
फक्त माणुसकीच्या नात्याने,
माणसांशी जोडले जावे.
प्रेम, आपुलकी आणि सद्भावना,
ह्याच माझ्या खऱ्या दौलती.
याच पैशांनी मी श्रीमंत व्हावे,
हीच माझी खरी संस्कृती.
म्हणून देवा, ऐक माझी प्रार्थना,
कर हे माझे स्वप्न साकार.
श्रीमंतीच्या यादीत नको,
माणुसकीच्या यादीत दे थोर मान.
श्री अजयकुमार लांडगे
मांडवगण ता श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर
Comments
Post a Comment