"बाप"
घरट्यासाठी दाणा गोळा करणारा, तो बाप असतो,
स्वतः उपाशी राहून पिल्लांना भरवणारा, तो बाप असतो.
ऊन, वारा, पाऊस झेलून जो उभा राहतो,
कुटुंबासाठी ढाल बनून लढणारा, तो बाप असतो.
आठवणींच्या शिदोरीतून आयुष्यभर पुरतो,
चुका सांभाळून, पाठीशी जो खंबीर राहतो.
शिकवतो चालायला, पडल्यावर सावरायला,
आयुष्याच्या वाटेवर दिशा दाखवणारा, तो बाप असतो.
गरजा कमी करून, इच्छा दाबून टाकतो,
आपल्या स्वप्नांना मुलांच्या डोळ्यात बघतो.
मनातल्या भावना कधी ओठांवर येत नाहीत,
अश्रू लपवून, हसणारा, तो बाप असतो.
निरागस स्वप्नांना पंख देणारा, तो बाप असतो,
न बोलता सारं काही समजून घेणारा, तो बाप असतो.
आधार असतो, विश्वास असतो, प्रेमाचा सागर असतो,
अष्टपैलू भूमिकेत जगणारा, तो बाप असतो.
श्री अजयकुमार लांडगे मांडवगण ता श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर
दिनांक १०/०६/२०२५
Comments
Post a Comment