अहिंसेच्या पुजार्याची हिंसा अजूनही मनात धगधगत आहे....
तीच आग आणि तोच धूर अजुन पंचत्वात घुमत आहे ....
जळालेल्या वाड्या समोरील तुळशी वृंदावन अजूनही काळेकुट्ट आहे...
आया बहिणीची चिकार अजूनही मनात घुमत आहे...
संसाराची राखरांगोळी करुन धिंड आमची काढली...
निर्दोष असूनही कत्तल आमची केली...
विसरून कसं चालेल सगळ मनात आजुन साठून आहे...
तीच आग आणि तोच धूर पंचत्वात घुमत आहे ...
श्री. अजयकुमार लांडगे
दिंनाक 30/01/2021
(गांधी हत्ये नंतर झालेला हिंसाचार वर आधारित)
Comments
Post a Comment